नारदाची कळ----१५
भ्रष्टाचारावरचा नवा तोडगा: जन-लोकपाल-फंड
आत्ताशी शहाणे लोक जन-लोकपाल-बिलाचा मसूदा वाचायला लागलेत. आता बर्याच जणांना जाणवायला लागलेय की हे प्रकरण दिसतेय तेवढे सरळ नाहीय. कोणी सांगावे ह्या मागे कोण असेल व त्याचा लाभ कोणाला मिळेल. तर शेवटी काय, हे राजकारणी अण्णांच्या जन-लोकपाल-बिलाला बधतील असे वाटत नाही.
आता ह्यावरचा अक्सीर रामबाण उपाय माझ्याकडे आहे तो जरा ऐका: "जन-लोकपाल-फंड":
१) एक फंड तयार करायचा, "जन-लोकपाल-फंड". ह्याचे सदस्य असतील त्या त्या मतदारसंघातले सर्व नोंदणीकृत मतदार. त्यांचे बॅंकेत खाते असणार, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असणार, युआयडी ओळखपत्र असणार.
२) लोकपाल बिलातून ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ह्या फंडात खालील प्रमाणे रोख रक्कम भरायची आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना जन-लोकपाल-संघटना एक एक्झेंप्शन सर्टीफिकेट देईल, ज्यानुसार त्यांना जन-लोकपालांच्या भावी कारवाईतून मुक्ती मिळेल ( फक्त एक वर्षासाठी ):
नगरसेवक : रुपये : १ लाख
जिल्हा परिषद सभासद : रुपये : २ लाख
विधानसभा सदस्य : रुपये : ५ लाख
राज्याचा मंत्री : रुपये : १ कोटी
राज्याचा मुख्यमंत्री : रुपये : १० कोटी
लोकसभा सदस्य : रुपये : १० कोटी
केंद्राचा मंत्री : रुपये : १५ कोटी
केंद्रातले पंतप्रधान : रुपये : २५ कोटी
३) हा जन-लोकपाल-फंड दिल्लीत एकेठिकाणी असेल. भारतातल्या सर्व ठिकाणच्या शाखात त्यात पैसे जमा करण्याची मुभा असेल. त्यात जमा झालेली रक्कम समप्रमाणात प्रत्येक मतदाराच्या वैयक्तिक खात्यावर वर्षाच्या शेवटी हस्तांतरित करण्यात येईल. जन-लोकपाल-फंडाचे ऑडिटर ( किंवा लोकसभेचे सीएजी ) किती पैसे वाटायचे ते नक्की करतील.
४) एक्झेंप्शन सर्टिफिकेटचा भाव/दर दरवर्षी, कसा निधी जमा होतो, त्यावरून ठरवण्यात येईल. समजा खूप लोक पटापट पैसे भरताहेत असे दिसले ( उदा: २८ पैकी १४ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजा पैसे भरले, तर पुढील वर्षी त्यांचा भाव/दर प्रत्येकी १० कोटीहून वाढवून प्रत्येकी रुपये १२ कोटी करण्यात येईल. असेच वाजवी दर इतर राजकारण्यांसाठी ठरवण्यात येतील. हे पैसे राजकारण्यांनी निवडून आल्यावरच भरायचे असल्यामुळे व ज्यांना जरूर असेल त्यांनीच हे भरायचे असल्यामुळे ह्याने भ्रष्टाचार वाढणार नाही. ज्यांना आपण भ्रष्टाचार करणार नाही आहोत, अशी खात्री आहे त्यांना हे खर्च करावे लागणार नाहीत. तसेच समजा एखाद्याने एखाद्या वर्षी पैसे भरले पण कोणीच त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली नाही तर दुसर्या वर्षी त्याने पैसे नाही भरले तर चालण्यासारखे आहे. तक्रार झाल्यावरही कोणाला मुक्ती हवी असेल तर तत्काल टिकीट जसे दुप्पटीचे असते तसा त्यांना दुप्पट दंड भरावा लागेल.
५) ट्रॅफिक पोलिसांनी वसूल केलेली दंडाची रक्कम वाटून घेतली तर जसा सामुदायिक जलसा होतो त्यावरूनच ही कल्पना सुचलेली आहे. ह्यात समजा राजकारण्यांनी दंड भरायचे कमी झाले तर चांगलेच आहे. कारण त्यावरून भ्रष्टाचार कमी होतोय असेच ठरेल. शिवाय आज राजकारणी जे मोकळे सुटतात त्याऐवजी चोराची पूर्ण रक्कम नाही तर काही तरी हाताला लागेल व ते सर्वांना वाटून दिल्याने सत्कारणी तरी लागेल. नाही तरी आजकाल सबसिडी अशीच बॅकेच्या खात्यातून द्यावी अशी सूचना पुढे येतेच आहे.
६) कोणी असा समज करून घेऊ नये की जन-लोकपाल-फंड हे बेकायदा कृत्य होईल. कारण अमेरिकेत व युरोपात प्ली-बारगेनींगच्या पद्धतीमुळे त्यांच्याकडे न्यायदानाचे काम खूपच लवकर व कमी खर्चाचे होते आहे. हा फंड हा एकप्रकारचा प्ली-बारगेनींगचाच एक प्रकार आहे, जो प्रगत देशात अगदी कायदेशीर समजल्या जातोय.
---------------------------------------------------------------------------------------------
रविवार, २४ एप्रिल, २०११
रविवार, १७ एप्रिल, २०११
अण्णांचा दुभाष्या
आम्ही मागच्या वेळेसच दाखविले होते की जंतर-मंतरच्या उपोषणाच्या गादीवर बसलेले असताना, लोक सारखे अण्णांच्या कानात येऊन कुजबुजत होते. तर हे चांगले दिसत नाही म्हणून अण्णांनी आता प्रमुख मागणी केलेली आहे की त्यांना सरकारने एक दुभाष्या द्यावा. त्याप्रमाणे हा दुभाष्या आला व त्याच्या पहिल्याच मीटींगचा हा अनुवाद अण्णा वाचू लागले :
१) ह्यापुढे होणार्या सर्व जलद-मृत्यू कार्यक्रमासाठी सरकार जंतर-मंतर येथे रोज न्याहरी पुरवील, शक्य तितक्या लवकर.
( In future, for all the fast-unto-deaths to be undertaken at Jantar-Mantar the Govt. will endeavour to break fast , as soon as possible.)
२) ह्यापुढे जे कोणी जलद-मृत्यू चा कार्यक्रम हाती घेतील त्यांचे प्रत्येकी पाच सदस्य सरकार आपल्यात सामाऊन घेईल.
( Hereafterwards those who undertake fast unto death, the Govt., will co-opt their five members. )
३) जर जलद-मृत्यूच्या एखाद्या सदस्याविरुद्ध भानगडीच्या काही कडा प्रसिद्ध झाल्या आणि त्या कडाही भ्रष्ट आहेत असे जाहीर झाले,तर त्या सदस्याला राजीनाम्यापासून मुक्ती मिळेल.
( If any CDs are published about any member of the fast-unto-death, and if these are found to be corrupt then that member will be exempt from resignation. ).
४) जरी सभ्य-समाजाच्या सभासदांनी आपापल्या संपत्ती जाहीर केलेल्या असल्या तरी अ-सभ्य-सभासद तसेच करण्यास बांधील असणार नाहीत.
( Notwithstanding the self-disclosure of property by the members of the civil society, the others would not be bound by the same.)
५) ह्या पुढचे सर्व सभ्य-समाजाचे सभासद असे असतील की ते मायला, भूषणच असतील.
( All the future members of the civil society will be such that they will adorn the mother country.).
६) सर्व सभ्य-समाजाच्या सभासदांच्या सूचनांना प्रत्येकी एकेक टोपी घातली जाईल.
( The suggestions given by the civil society will be capped at one suggestion each ).
७) ह्यापुढले कोणतेही जलद-मृत्यूचे कार्यक्रम, हे काळे-टपाल न समजता सरकार ते स्वीकारील .
( The fasts-unto-deaths undertaken hereafterwards, would not be considered as black-mail and govt., would accept these. ).
८) पहिल्याच मीटींग मध्ये असे ठरले की सर्व पंतप्रधान, मंत्री, खासदार , सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी व इतर अर्जदार हे लोकपालांच्या अधिकार कक्षात येणार नाहीत. ( जसे अर्ज येतील, तसे त्यांच्याविरुद्ध स्ट्राईक करण्यात येतील.).
( After due discussion, it was decided that PM, Ministers, MPs, and secretary level beurocrats would fall / not fall under the jurisdiction of the lokpal-bill, as applicable. ). ( Strike out whatever is not applicable ).
९) ह्यापुढची मीटींग, योग्य अभ्यासक्रमात , मे मध्ये घेण्यात येईल.
( The next meeting, may be held in due course. ).
१०) खासदारांना जसे लोकसभेत दुभाषी-कान-फोन असतात तसे वा मानवी दुभाष्ये अण्णाना हजारोंनी पुरविण्यात येतील.
( As the mechanical interpreting head-phones are provided to MPs , the same and/or human translators would be provided to Anna Haazare ).
विशेष सूचना: सर्व सरकारी निर्णय मुळात इंग्रजीत घेण्यात आले आहेत, ते फकत सोयीसाठी त्यांच्या मायला, जिभेने दिलेले आहेत.
(NB: Official resolutions are made in English and are translated for the convenience of the mother tongue speakers )
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११
नारदाची कळ---१३
अण्णांचे फिक्सिंग
२-जी, कॉमनवेल्थ, आदर्श, नोट-फॉर-व्होट, देवास, सीव्हीसी व अशा अनेक घोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची छबी मळली, हे तर त्यांनाही कळलेच. तशात तीन-चार राज्यात निवडणुका लढवायच्या आहेत. तिथेही ह्या भ्रष्टाचारामुळे मार खावा लागेल. आता भ्रष्टाचाराची ही छबी धुवायची तर आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत, हे लोकांना सहजी पटेल असे व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता राज्य करणे, हे तसे जिकिरीचे व लांब पल्ल्याचे काम. त्याच्याने छबी धुवायला खूपच उशीर लागेल. गेले तीन चार महिने आपले संवाददाते तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहोत, निदान कारवाई करतो आहोत, असे घसा फोडून फोडून तसा प्रयत्न करताहेत . पण ते कसे तुलना केल्यासारखे होते. आधी त्यांचे नाव घ्यावे लागते. आम्हीच बेश्ट आहोत असे ठसवायला हवे. तर मग स्वच्छ वागून दाखवायला हवे. पण, तितका वेळ आहे कुणाकडे ? मग मालिकेत कसे, नायिकेचे चारित्र्य उठविण्यासाठी खलनायकाला अडचणीत आणतात, त्याला हाणतात, तसे, शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या वळणाचे काही तरी पटकन करायला हवे. हे कसे करायचे ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करायची वगैरे बाळबोध मार्गाने एकतर वेळ चिक्कार लागेल व शिवाय त्यात आपला काय फायदा ? आणि तरीही छबी अशी झाली पाहिजे की बघा, आम्ही किती भ्रष्ट्राचार्यांच्या विरुद्ध आहोत हे पटकन जनतेच्या ध्यानात यायला हवे.
तर साहेब, तुम्ही ते हिंदू आतंकवाद्यांचे चित्र उभे केले होतेत, तसे काही कराना. तुमच्याकडे एवढ्या आयडिया असतात. मग जमले तर तुमच्या लव्हासाचे बघू ना काही निस्तरता येते का ते. तर काही तरी छबी सुधरवण्याचे बघाच . भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत असे चित्र तयार होईल असे काही तरी बघा ना.
हां. भ्रष्टाचार का ? भ्रष्टाचार-विरोधी छबी काय ? बरं, अरे ते आपले अण्णा काय करताहेत आजकाल ? काही नाही ? लोकपाल बिलाचा आराखडा वगैरे करताहेत. व्वा ! व्वा ! बेस ! काम झाले की. त्यांना बोलवा इथे. बसवा जंतर मंतर ला. फार तर काय, तर बिलाचे करावे लागेल एवढेच ना ? अशी तर, ढीगभर बिले पडून आहेत आपल्याकडे. त्यातून नंतर काही तरी मार्ग काढता येईल. शिवाय नंतर कमीटीतही काहीतरी करता येईलच. पण आत्ता तर परस्पर रान पेटवून आपली पोळी शेकता येईल. फक्त माझे नाव मध्ये आले नाही पाहिजे. ते अवघड नाही हो, तुम्ही चिडून कमीटीतून बाहेर पडा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. पण थोडे ताणून धरले पाहिजे. जॉइंट कमीटीसाठी . असे कसे करता येईल म्हणायचे . मग पार्लमेंटच बरखास्त करा म्हणायचे . मग कमीटीत पाच जण घेतो म्हणायचे, मग नोटिफिकेशन नाही काढत म्हणायचे . आत्ता मॅडम दक्षिणेत निवडणूक-प्रचारात आहेत म्हणायचे . आणि मग मी सांगीन तेव्हा हो म्हणायचे. मग अण्णांची तारीफ करायची. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे खूप स्तोम माजवायचे . पाहिजे तर भारत-रत्नही द्यायचे. मग आपसुकच आपण त्यांचे मानले, म्हणजे आपण त्यांच्या बरोबरच होतो, हे वेगळे सांगायला नकोच. निवडणुकात बघा ह्यावरच मतं मिळतात की नाही.
पण, हे बघा, हे सगळे आमच्या आय-पी-एल च्या आधी संपले पाहिजे हां. नाही तर आमचा धंदा मंदा व्हायचा !
ओ के ? फिक्स ?
----------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११
जातीच्या लेखकाला, जातीचा पद्मश्री !
नेमाडेंना पद्मश्री मिळाल्याबद्दल काय वाटते ? असे जे विचारतात, त्यांना सांगावेसे वाटते की, प्रथम त्यांनाच काय वाटतेय ते बघूया. आता त्या थोर थोर मिशीतले, ह्या मिशाने ऐकायला मिळणार, असे वाटून गर्भगळित व्हायचे कारण नाही. कारण प्रत्येक दृष्ट्या पुरुषांसारखे त्यांनी, हे देशीवादी परंपरेने मागेच सांगून ठेवले आहे. कसे ते पहा: (टीकास्वयंवर पृ.३८३) "एकतर राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणार्या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात."
कंपूशाही, दोनचार मूर्ख माणसं, असे कळीचे शब्द ऐकून भालचंद्र मुणगेकरांना वाटले असेल ह्याला "मागचे" कळले की काय ? तरी बरे की सिमल्याच्या शिष्यवृत्तीचे मीच जमवून आणले होते, ते हा विसरला की काय ? मग राडीया टेप्स कोणी लीक केल्या ह्या चालीवर ते प्लंबरसारखे लीक हुडकू लागले. तोच त्यांना राष्ट्रपतीभवनातून फोन आला की, "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं !"
आता महाराष्ट्राचा कोटा, यादी, केव्हाच संपली असताना, आता बाई कोणाचे सांगताहेत बरे ? एकच काम अनेक जणांनी वाटून घेण्याच्या तीळ-संस्कारा प्रमाणे, बाईंनी विलासरावांनाही निरोप दिला. विलासरावांना कळेना की एवढा काय प्रॉब्लेम त्यात ? आपण घालू तो आदर्श ! मग कळले की महाराष्ट्राच्या कोट्यात, साहित्याच्या जंत्रीत, बाईंच्या पसंतीचे नाव काही नव्हते. ते राहिलेच.
विलासराव गेले शिंद्यांकडे. शिंद्यांनी धूर्तपणे विचारले की बाई एक्झॅक्टली काय म्हणाल्या ? आता "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं!" ह्यातून अर्थ काढायचा होता. शिंदे तसे कशातूनही "अर्थ" काढण्यात पटाईत. ते म्हणाले बाई म्हणाल्या "आमच्या त्या ह्यांचे", म्हणजे कोणी लेवा-पाटील असणार. कोण बरं ? लेवा पाटील म्हणतात की मूळचे पाकीस्तानातल्या पंजाब मधले, लाहोरचे. आता त्या अफझल गुरूचा कोणी आहे की काय ? काही नेम नाही ! जरा मोघम चौकशी करू. आधी दरवानाला विचारतात, कौन मुसलमान हौ क्या ? दरवान हिंट देतो, नही जी, हिंदू ही है !
तेव्हढ्यात मुणगेकर म्हणतात अहो "हिंदू"म्हणजे नेमाडे असतील. कारण तेच एकमेव लेवा आहेत मराठीत, बहिणाबाई नंतर !
विलासराव म्हणतात की उगाच रिस्क घेऊ नका. मॅडमनी सांगून ठेवलेले आहे की बाईजींवर उगाच प्रेशर येऊ देऊ नका. त्या आपल्या अफझल गुरूचे पाहताहेत ना, मग त्यांच्या एका हिंदू चे आपण पाहू शकत नाही का? चला जरा प्रयत्न करू ! मुणगेकर, काय आहे हो हे हिंदू ? त्यावर मुणगेकर म्हणतात की तसे साहित्य अकादेमीला सांगितलेले होते... पण अजून त्यांनी काही पुरस्कार दिलेले नाहीत. तेव्हा बाईंना आत्ताच काही करायचे असेल... तसे हे लेवा पाटील मूळचे पंजाब, पाकीस्तानातल्या लाहोरचे. मग विलासराव माहीती काढतात की पंजाबची लिस्ट झाली का फाइनल.? झाली ! हरयाणाची ? ती अजून बाकी आहे. असं म्हणता ? मग काही प्रॉब्लेम नाही. नुकतेच विश्वास पाटिलांनी नाही का सांगितले की पानीपतानंतर भाऊ वगैरे मंडळी हरयाणातच होती व तिथे त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते लोक चालीरीती, फेटा वगैरे मराठी वळणाचाच बांधतात. आपण त्यांच्याच फेट्याला हे लचांड बांधू .
अफजल गुरूच्या बदल्यात जमले म्हणायचे की !
तुम्हाला वाटेल का उगाच जात काढताहेत अशा वेळी ? तर तेही नेमाडेंनीच शिकविले म्हणावे लागेल. जात काढण्यात काय संकोच ? म्हणूनच तर त्यांनी "हिंदू" त ज्ञानेश्वरांची व रामदासांची जात आरामात काढली आहे. कुणब्यांचीही काढली आहे. एवढेच काय सिद्धार्थ गौतमालाही दूषणे दिली आहेत. शिवाय अशा जाती काढून त्यांनी वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत. जसे:( टीकास्वयंवर पृ.३७९ ):"आमच्या वेळी साधना होती...आज साधना ही ट्रस्ट समाजवादी चित्पावनांनी बुडवली. केसरीच्या सिंहाला गवत खायला लागलं. सेवादलातली समाजवादी माणसं कटटर जातीयवादी निघाली." ( इत:उप्पर ते अभिमानाने म्हणतात की त्यांना फक्त ( नशीब, फकत, नाही ! ) साने गुरुजी भावतात व त्यांनी साधनेत एक वर्ष नोकरीही केली आहे. ).
खरे तर २००१ साली महाराष्ट्र फौंडेशनने नेमाडेंना जीवन-गौरव पुरस्कार दिलेला होता. म्हणजे ते तेव्हाच बक्षीस मिळालेले लेखक झालेले होते. त्यांनी इतर लेखकांना आदेश दिला आहे तो असा: "अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा, असं मी चांगल्या लेखकांना सांगेन. कारण बक्षीस मिळालेल्या लोकांच्या यादीत बसण्यापेक्षा ते न मिळालेल्या लेखकांच्या यादीत जाऊन बसणं अर्थातच सोपं असतं." ( टीकास्वय़ंवर पृ. ३८४ ). ३५ वर्षात हिंदू ने त्यांना इतकं पिडलेलं दिसतं की त्यांनी स्वत: कुठल्या यादीत बसायचं हेच ते विसरले असावेत ! किंवा मग विद्रोह भावला असावा ! आदत से मजबूर !
तर असा जातीच्या लेखकाचा जातीचा किताब !
-----------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, १५ जानेवारी, २०११
नारदाची कळ---१२
अकलेच्या कांद्याची गोष्ट
एक होता कांदा. अहो तो महाग-वाला नाही, अकलेचा. अकलेला मती म्हणतात, तर हा बारा अकलेचा ! ( कदाचित बारामतीचा !) तो अगदी पहिल्यांदा बेता बेताने, बांधा बांधाने ( कुंपणा कुंपणा ने ) लागवडलेला होता. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तोच कुंपणाच्या देवाने, कराडच्या देवाने, त्याला आपल्यात घेतले, आपला मानसपुत्रच मानले व स्वत:सारखे "यशवंत" केले. ह्यानेही सहकार दिला, घेतला. होता होता, हा सगळीकडेच वावरू लागला. राज्यात मुख्य झाला, केंद्रात सुरक्षेच्या बाडबस्तात सुरक्षित झाला. कांद्याला असे घुमारे फुटू लागल्यावर त्याला आपल्या मुळाचा लईच अभिमान वाटू लागला. कोणाचे मूळ परदेशी असेल तर ते त्याला रुचेना. त्यासाठी त्याने आपापल्या मुळांचा देशी वाफाच काढला, ताफा वाढवला व विदेशी मुळांना तो कमी लेखू लागला.
पण भारतदेवाच्या मनात काही वेगळेच होते. परदेशी मुळाचे कांदे जोम धरू लागले, त्यांना कुठली तरी सूप्त परदेशी गंगाजळी मिळू लागली व त्या परदेशी कांद्याने चांगलेच बाळसे धरले . सगळे वावर व्यापून टाकले. आता बांध्यावरच्या कांद्याला मुख्यप्रवाहात डुंबावे असे हुळहुळू लागले. मग त्याने मुळेच ना ती, ती देशी काय व परदेशी काय असे म्हणत परदेशी मुळांच्या कांद्याशी दिलजमाई केली. परदेशी कांद्याला खांदा दिला, सापडेल तिथे चांद्या शोधल्या, जमवल्या, आणि देशात सगळीकडे आपल्या फांद्या पसरविल्या.
परदेशी कांद्याची रीतच न्यारी. त्याला वाटू लागले मी किती निर्मळ, स्वच्छ संगमरवरी ( इटालियन संगमरवरच जणु ) रूप, काय ती उभारी, काय तो तोरा ! तेव्हढ्यात त्या परदेशी कांद्याला आतले आवाज ऐकू येऊ लागले. त्यालाही वाटू लागले आपण जरा आतल्या आतच रहावे. कावळा शिवल्यासारखे बाजूलाच रहावे . आपण पुढे होऊ नये. मग त्याने त्यातल्या त्यात धुतलेल्या तांदळासारखा वाटणार्या पंजाबी कांद्याला पगडी पहनवली. पगडी, आनंदाने परदेशी कुंकू मिरवू लागली. बारा-अकलेच्या कांद्याने वाफ्यात नफा काढायची जबाबदारी घेतली. सगळीकडचे वाफे तरारून येतील, असे तो सांगू लागला. आपले मूळ गाव, बारा-अकली गाव, असलेल्या राज्यात देशी-विदेशी कांद्याची जोड-लागवडही त्याने चालू ठेवली.
बारा-अकली कांदा जोशात आला, उडू बागडू लागला, खेळ खेळू लागला. असा तसा देशी खेळ नाही तर परदेशी कांद्याला टुकटुक करणारा, त्याची विकेट काढणारा, परदेशी खेळ, क्रिकेट ! हा खेळ इतका चढू लागला की त्या बोभाट्या पाई त्याला लोक पीयेल समजू लागले. तो म्हणे काय बोलता, मी ? आय पीयेल ?
वाफ्यावरचे काम असे चालू असताना एक अवघड घडी आली. वाफ्याचा खर्च ताफ्याला परवडेना . ताफ्यातले एकेक गडी आत्महत्येने पडू लागले. सगळीकडे गदारोळ माजला. बारा-अकली कांद्याने थाप ठोकली, ही कांद्याची शेतीच परवडणारी नाही . सबब कोणी कांदे पेरुच नयेत. पगडी गदगदली. तिला वाटले जीव वाचला तर पगडी काय, पचास पेहनू . मग त्याने ताफ्याला सर्व-माफी दिली, कर्ज-माफी दिली. बारा-अकली कांद्याला हुरूप आला. त्याने आता थंड हवेच्या ठिकाणी लागवड होऊ शकते का, हे पाहण्यासाठी डोंगर कापले, दर्या बुझवल्या व उंचावर एक ठिकाण केले, इतके छान की बारा-अकली कांदा अगदी "हवासा" झाला, लव्हासा झाला !
तेव्हढ्यात कोणाची तरी नजर लागली. आतल्या गाठीच्या ह्या बारा-अकली कांद्याच्या तोंडाशी एक गाठशी आली. फवारून झाले, टोकरून, खुडून झाले. तशी तरारी आहे, खतपाणी अंगी लागते आहे. पण त्या तोंडाच्या गाठी मुळे तोंडातून शब्दांऐवजी आजकाल मुक्ताफळेच येतात. लवकरच आलबेल होईल असे म्हणायचे असते, पण तोंड बोलून जाते...कमसे कम तीन हप्ते लगेंगे ! परदेशी कांद्याचा छोटा कोंभ, हूल देत, मग रागावून म्हणतो, मेरे दादी का राज अकेली का था, ये हमारी मजबूरी है, ( मजबूरी का नाम गांधी !). त्यावर तोंड लगेच तावातावात उदगारते, इटली मे भी मजबूरीच है ! पगडी घाबरून पाकी कांद्याला पाचारण करते तर तोंड लगेच खोड काढते, ह्यापेक्षा आपल्याच बळीराजांना का नाही देत जरा ज्यास्तीचा भाव ?
पानीपतावर मराठयांची पत गेल्याला भले आज अडीचशे वर्षे झाली असतील, पण त्याचा वचपा काढतोय, बघा, बारा-अकली कांदा व त्याचे तोंड !

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०
नारदाची कळ----११
जगतगुरू कोंड देव !
जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !
संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !
कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?
सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !
क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०
नारदाची कळ-----९
सोपी लिकिते !
विकी-लीक्स ने इतके भंडाऊन टाकले आहे की आता "गुपिते"ला पर्यायी शब्दच झाला आहे : "लिकिते" !. मराठीत र्हस्व दीर्घाची भानगड ह्या शब्दाला लागू होत नाही. म्हणजे कोणी र्हस्व लि व कि वापरले व लिहिले "लिकिते" तर इंग्रजीतले टू लिक म्हणजे चाटणे हा अर्थ धरून हे कोणाचे चाटण आहे ते लोकांनी पहावे. व जर ली व की दीर्घ काढली तर नैतिकता कोणाची लीक होते आहे ते पहावे. आता इतके लीक्स होऊन होऊन सगळा माहोल इतका दल-दलीत झाला आहे की सरळ साध्या गोष्टी आता "सोपी लिकिते" ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही वानगी दाखल पहा:
१) राहूल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू दहशतवाद हा भारताला ज्यास्त धोकादायक आहे का, ह्याची पाहणी सीबीआय ने केली. त्यात त्यांना आढळले: हिंदू दहशतवादी हे फारच बेभरवशाचे आहेत. ते उग्र आंदोलने करतील असे वाटते पण तेव्हा ते करीत नाहीत. राम मंदीर बनवायचे म्हणतात पण बनवत नाहीत. कित्येक ठिकाणी ह्यांचे बॉम्ब फुसके निघतात, फुटतच नाहीत. हे निरनिराळे प्लॅन्सही योजून रद्द करतात. आरएसएस च्या प्रमुखांना मारणार म्हणतात पण कोणीच मारीत नाहीत. आजकाल तर ह्यांच्या संघटना कमालीच्या विचित्र झाल्या आहेत. उदा: गुजरातेत ह्यांच्या पार्टीत मुसलमान निवडून येतात तर हे पार्टीचा प्रवक्ताच मुसलमान ठेवतात. मालेगावच्या प्रकरणातही आढळते आहे की ह्यांनी स्फोटके मुसलमानांकरवी ठेवली. असे जर वाढू लागले तर पुढे चालून भगवा व हिरवा दहशतवाद ओळखू न आल्याने सीबीआयला रंगांधळे व्हावे लागेल.
२) वरील बाबीचा धसका घेऊन सरकारने हिंदूंच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता एक कमिशन नेमले आहे. निवृत्त न्यायाधीश मोहमद रचसा ( हे गृहस्थ "साचर" च्या अगदी विरुद्ध आहेत हा निव्वळ योगायोग समजावा !) सध्या पाहणी करीत आहेत. त्यांचे काही निष्कर्ष : हिंदूंना कधीही आरक्षण नव्हते. त्यामुळे त्यांना सर्वत्र स्पर्धेला तोंड देऊन जगत राहावे लागले. त्यात ते सारखे यशस्वीच होत राहिले. त्याची मुसलमानांना खूप असूया वाटते. तर हा असमतोल घालवण्यासाठी शासकीय नोकर्यात हिंदूंना मुसलमानांसारखेच १५ टक्के आरक्षण द्यावे. म्हणजे ते थोडे तरी सुखावतील व आळशी होतील. तसेच सीबीआय च्या पाहणीनुसार सध्या गुन्हेगारात ४० टक्के मुसलमान आढळतात व हिंदू केवळ १० टक्के. तर हाही असमतोल घालवण्यासाठी हिंदूंना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. विशेषत: मोठ्या गुन्हयासाठी. जसे पार्लमेंटवर, मुंबईवर हल्ला करणे. फार तर ह्यात आझमगढी मुसलमान बंधू त्यांचे प्रशिक्षण करू शकतील. त्यांना फाशी-माफी देण्याचा सरकारही विचार करील.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)