marathi blog vishva

गुरुवार, १ जुलै, २०१०

नारदाची कळ-५
पवारफुल क्रिकेट
आय सी सी आय चे माल्कम स्पीड ह्यांनी आरोप केलाय की पवारांना अध्यक्ष झाल्यावर पूर्ण वेळ मिळणार नाही. कारण ते भारताचे कृषी मंत्री आहेत व १२० कोटी लोकांच्या अन्नधान्न्याची व्यवस्था करण्यापासून त्यांना फुरसत मिळणार नाही. आता आपल्याला माहीत आहे की कृषीमंत्री काही पूर्णवेळ काम करणारे नसतात. आपल्याकडे पाऊसच दोन तीन वर्षांतून एकदा पडतो, शेतकरी इतके गरीब असतात की क्वचितच शेती करू शकतात, शिवाय ती परवडतही नाही. त्यामुळे हा आरोप जाऊ द्या. पण त्यांनी पुढे असे म्हटलेय की पवारांना क्रिकेट मधले कळत नाही. आता मात्र पवारांना क्रिकेट कळते हे दाखवूनच द्यावे लागेल.सोनी वाल्यांनी ( ह्यात सुप्रियांचे भांडवल आहे ) एक कार्यक्रमच ठेवला, "कळतच नकळत कळते ". ह्यातील काही सवाल-जवाब :
सोनी : एकाच वेळी दोन फलंदाज रन-आऊट होऊ शकतात का ?
पवार : कसे शक्य आहे ? आमची परंपराच आहे की एका वेळेस एकच जण "आऊट" होऊन बोलू शकतो. जसे: मी म्हणालो की शेती परवडत नाही, शेतकर्‍यांनी ती सोडून द्यावी की लगेच मॅडमकडून पॅकेजेस येतात. आमचे संपादक म्हणाले की साखरेचे भाव वाढले हे चांगलेच आहे कारण कमी साखर खाल्ल्याने मधुमेह होणार नाही, तर मग मी त्यांना कार्ल्याचा रस प्यायला लावतो.माझ्यावर काही आरोप झाले तर पटेलांना क्लीन चिट्‍ मिळते.किंवा सुप्रियाला.
सोनी : एकदा "रिटायर्ड हर्ट" झालेला फलंदाज परत खेळू शकतो का?
पवार : का नाही ? मी स्वत: किती वेळा तरी परत खेळायला आलेलो आहे. आता आय पी एलचेच पहा. तिकडे भानगडी निघाल्या तरीही इकडे आयसी्सी चे जमलेच की ! आठच एमपी आले तरी दोघा तिघांना घबाड मिळालेच की. कधी मुख्य, कधी संरक्शण, कधी विरोधी, तर कधी कृषी मंत्री ! आता तर लोक म्हणायला लागलेत की क्रिकेटला दुसरे नाव ठेवा : प्वार-खेळ ! खरा अर्थ घ्या : पवार-खेळ ( विरोधक म्हणतील, पोर-खेळ , तर ते खरे नाही !)
सोनी : "फॉलो ऑन" म्हणजे काय ?
पवार : हा आमचा आदेश आहे. सगळ्या सग्या सोयर्‍यांना व जणतेला. आमच्या मागे या, कारण यातच आमचे भले आहे !
अर‍र बदलला का चॅनल !

-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

३ टिप्पण्या:

  1. "स्पीड"स्टर माल्कम यांना फुकाची प्रसिद्धीची संधी "पवारांमुळे" मिळतेय नाहीतरी य्हानी फुल टाईम असताना काय केले होते म्हणून ते आता" अपेक्षा बाळगता आहेत, मात्र जॉनरावांची "विकेट" स्वस्तात काढली याचा आनंद आहे. एखाद्या घटने कडे कोण कसा बघतो हे त्याच्या विचारांवर अवलंबून असत, असो. एकंदरच क्रिकेटचे विडंबन आवडले. खूप दिवंसांनी पोस्ट केलस.

    प्रभंजन

    उत्तर द्याहटवा