marathi blog vishva

मंगळवार, ८ जून, २०१०

नारदाची कळ-४
लप फायनान्स, लपा लपा, लपलप !
कोणीही उठावे व शरद पवारांना टपली मारून जावे ! आणि कार आश्चर्य, ते खरेच निघते ! आता आयपीएलचेच पहा ! टाईम्सने जनरल वाईड बॉल टाकला की सिटी कॉर्पोरेशन मध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि काय योगायोग लॅप फाइनान्स ह्या कंपनी मार्फत त्यांचा सहभाग आहे हे खरेच निघाले. आता कळते आहे की ही लॅप फाइनान्स कंपनी खरे तर आहे "लप फाइनान्स". लपालपीच्या खेळात आपण जसे लपतो व ज्याच्यावर राज्य असेल तो आपल्याला शोधतो तसे कुठलीही गुंतवणूक लपवायची असेल तर ही "लप फाइनान्स" कंपनी ती गुंतवणूक बेमालूम लपवते. मुळात भारतीय असलेल्या ह्या लपालपीच्या खेळालाच शरद पवारांनी त्याचे नामाभिधान "आय पी एल" करून ( लपालपीचेच हे भाषांतर आहे असे सकाळचे पवार, शरद पवारांना रात्री सांगत असताना खूप जणांनी ऐकले आहे असे कळते !) प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे हे मात्र लोक विसरतात.
लपालपा, लपलप, साहेब जात आहेत !
-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

२ टिप्पण्या:

 1. असे म्हणतात कि गोविंदराव आणि अनंतराव हे यशवंतरावा बद्दल असलेल्या प्रेमापोटी त्यांच्यावर टीका करीत असत तसच तू शरद पवारांन बद्दल तू जे काही लिहितोस ते त्यांच्या प्रेमापोटी कि सहन न झाल्या मूळे. संभ्रम ....
  प्रभंजन

  उत्तर द्याहटवा
 2. आजकाल भ्रष्टाचार इतका सर्वमान्य होतोय की हाच शिष्टाचार आहे असे वाटू शकते. आता केवळ आकसाने एकाच व्यक्तीविरुद्ध लिहिणे बरे नाही हे दाखवायला मला बर्‍याच जणांविरुद्ध लिहावे लागणार आहे.
  माझे हे प्रेम सर्व भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध फळफळावे हीच ईच्छा !
  अरुण भालेराव
  arunbhalerao67@gmail.com

  उत्तर द्याहटवा