marathi blog vishva

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

नारदाची कळ
भारतीय वृत्तपत्रे भाषा नीट छापण्याच्या कामात फारच चुका करतात. आता हेच पहा ना ! बिचारे शशी थरूर . यूनो च्या सेक्रेटरी पदासाठी निवडणूक लढलेला हा थोर माणूस.( आता निवडून नाही आला हे यूनोचे कमनशीब.). त्याच्या तिसर्‍या मैत्रिणी संबंधी सगळे पत्रकार खार खाऊन आहेत. सानिया सारख्या एका सुंदर मुलीचे लग्न होते न होते तोच आता ही कोण सुनंदा पुष्कर आहे तीही लग्न करते आहे. सुंदर मुलींचे कितवे लग्न हा कधी प्रश्नच नसतो. वाईट असते ते त्यांना इतरांनी फितविणे. ह्याच जेलसी-न्यायाने ही घटनाच भारतीय पुरुषांना डिप्रेशन आणणारी. त्यात भारतीय पत्रकारांनी इतकी ढोबळ चूक करावी ! ही सुनंदा पुष्कर आता शशी थरूर ह्यांची मैत्रीण आहे व ते तिसरे लग्न करणार आहेत हे किती चूक आहे. पुष्कर मैत्रिण नसून खर्‍या बातमीत "पुष्कळ मैत्रिणी आहेत" अशी ओळ होती. त्याची मुद्रणात चूक करीत सुनंदा पुष्कर ही एकच मैत्रीण आहे हा समज पसरविणे हे थरूर साहेबांचे बदनामी करणारेच आहे. आता ते नक्कीच अब्रू-नुकसानीचा दावा ठोकणार पत्रकारांवर. रहा आता तयार किंवा माफीनामा छापा की खूप सुंदर मैत्रिणी आहेत थरूर साहेबांना !
-------कळलाव्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा