नारदाची कळ---७
आम्ही Vs तुम्ही
चार्ल्स शूमर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यू यॉर्कचे सेनेटर. त्यांच्या कॉंग्रेस मध्ये ६०० मिलियन डॉलरचे बॉर्डर सेक्युरिटी बिलावर बोलताना ते म्हणाले की जशी सरहद्द महत्वाची तशीच त्या आत होणारी वागणूक महत्वाची. अमेरिकेची ज्यास्त पगाराची कामे काही कंपन्या बाहेरच्या देशात ( जसे: भारत ) देतात, तिथून स्वस्तात माणसे इथे आणतात व कर मात्र अमेरिकन जनता भरत राहते. तर ह्यांची माणसे इथे ज्या व्हिसावर येतात त्याची फी वाढवून २ हजार डॉलर करावी. इथे चोरीच्या गाड्या विकणारी गॅरेजेस असतात ज्यांना हे "चॉप शॉप" म्हणतात व गाडीचे पार्टस खिळखिळे करून मग ते विकतात. शूमरांच्या मते इन्फोसिस कंपनीही असेच एक प्रकारचे चॉप शॉप आहे.
आता ह्यावर भारतीयांना वाईट वाटणे साहजिक तसेच अमेरिकनांना स्वस्त भारतीयांचा राग येणे रास्त. आपल्याकडे नाही का आपण भय्यांना असेच बदडून काढीत. इथे निदान तसे भारतीयांना बदडत नाहीत हा अमेरिकनांचा चांगुलपणाच म्हणायचा.
आपल्या लक्षात येत नाही, पण बाहेरचे लोक येऊन येऊन आता इथे इतके विचित्र चित्र तयार झाले आहे की दर १२ नवीन जन्मणार्या बालकात २ बालके बेकायदा आलेल्यांची असतात. आता तर ह्यांना जन्माने नागरिकत्व मिळू नये असे बिल कॉंग्रेस करीत आहे. एरव्ही मॉल्स मध्ये सुद्धा आजकाल गोरी माणसे कमीच दिसतात, ज्यास्त करून मेक्सिकन, भारतीय व काळेच असतात. आपण मुंबईत जसे मराठी टक्का कमी होतोय ह्याची बोंबाबोंब करतो तशीच ह्यांची अमेरिकन टक्का कमी होण्याची ही खळखळ आहे.
मराठी माणसांचे बस्तान चांगले बसले आहे असे वाटावे तोच कळायला लागते की कसले हे मराठी-पण ? ह्यांच्या पोरांना ना मराठी येते ना हिंदी. पसायदान म्हणू लागलो तर नातवंडे म्हणतात "नो मोअर सिंगिंग आजोबा !" असेच अमेरिकनांना वाटते, अरे आमच्या नोकर्या तरी ठेवा, आमचे वळण तर चाललेच आहे .
आम्ही Vs तुम्ही असे वाटत असलेला हा तिढा, हळुहळू आम्ही तसेच तुम्ही असा होत चाललेला दिसतोय !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Naardaachi Kal---7
We Vs You
Charles Schumer is a senator from New York and is a democrat. Speaking on the 600 million $ bill for Border Security he opined that companies like Infosis, who are taking away well paying American jobs and giving it to cheap Indians are like "chop shops" ! ( Where stolen cars are dismantled and sold as parts ). And all this is being paid for by Americans through their paying taxes. Hence they feel that fees for legal visa should be increased to 2000 $ per visa to partly recover the taxes.
Well, Indians are bound to feel bad about this because we get cast in a poor light as cheap labourers. And Americans are right within their world as the composition of population is changing very fast. We can only thank Americans that they don't beat us like we beat Bhayyas in Mumbai for being large immigrants there.
Society really changes very fast, while economy keeps us busy looking after each ones of us interests. Because if they count every 12 new born babies, 2 out of them are born to illegal immigrants. Now the American Congress is debating through their proposition whether the by-birth-citizenship should be denied to such illegal immigrants children.
Even during visits to the maals we can notice the changing colours of society when we see less of While families and more of Mexicans and Indians. The Americans' concern about loosing jobs is same as our concern for Marathis loosing jobs and houses in Mumbai.
And are we immigrants happy about this newly aquired prosperity and life ? No, we lament the loosing of our ways of life, all the time.
So, on this issue, what appeared as opening stance of, We Vs they, gets slowly changed to, We and they !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com