नारदाची कळ--६
नीतीचा रंग, रगेलांची अनीती
सध्या अमेरिकेतले एक डेमोक्रॅटिक पक्षाचे वयोवृद्ध कॉंग्रेसमन श्री रेंजल ( स्पेलिंग प्रमाणे आपण यांना रंगेल म्हटले असते पण अमेरिकेत उच्चार स्वातंत्र्य असल्याने ते रेंजल म्हणतात ) चर्चेत आहेत. ८० वर्षांचे हे गृहस्थ न्यूयॉर्कच्या हार्लेम विभागाचे प्रतिनिधित्व करतात. समसमान १० सभासद असलेल्या एथिक्स कमीटीने ( नीती व्यवहाराची कमीटी असते ही किती दिलासा देणारी बाब आहे !) त्यांच्यावर एकूण १३ आरोप ठेवले आहेत. ह्यात मुख्य आहेत, स्वत:च्या नावावर होणार्या एका कॉलेजसाठी भरमसाठ देणग्या मिळवणे ( व त्या बदलात देणगीदारांचे कर कमी करून देणे ), अमेरिके बाहेत असलेल्या डोमिनिकन इथे एका बंगल्याची मालकी लपवणे व त्यावरच्या भाड्यापोटीचे कर न भरणे वगैरे. जोडीला काही तांत्रिक उल्लंघने आहेत. जसे : देणग्यांसाठी कॉंग्रेसची लेटरहेडस वगैरे वापरणे. सर्व बाबी पैशात मोजणार्या अमेरिकेत हे काही ७,८ मिलियन डॉलरचे प्रकरण तसे काही फार मोठे म्हणता येणार नाही. पण हे अवघड जागेचे दुखणे जरूर आहे. कारण नोव्हेंबरात निवडणूक आहे व ५० वर्षे बिनबोभाट निवडून येणार्या रेंजल यांना दोन तीन नवीन उमेदवारांशी लढावे लागणार आहे. शिवाय रेंजल ह्यांच्यावर फार कठोर कारवाई केली तर ते काळे असल्याने काळ्यांचा पाठींबा गमवावा लागणार.
जाणकार म्हणतात की हे प्रकरण तसे दोन वर्षांपासून तपासात आहे. रेंजल ह्यांना शिक्षा कमी करवून घेण्याची व तडजोड करण्याची मुभा आहे, पण त्यांनी ती अजून वापरलेली नसून ते पब्लिक ट्रायल साठी तयार होत आहेत.
हे प्रकरण वाचताना आपल्याकडच्या आरोपांची हमखास आठवण येते. मुळात आपले राजकारणी साळसूदपणे कागदपत्रे हाती लागणार नाहीत ह्याची छान काळजी घेतात . शिवाय कॉलेजेस काढणे हे आपल्याकडे आपण राजकारण्यांसाठीच सोडलेले कुरण असल्याने आपल्याला त्यात गैर वाटतच नाही. आणि आपल्याकडे कोणता राजकारणी सार्वजनिक खटल्यासाठी तयार होईल ?
अमेरिका भले आपल्या राजकारण्यांच्या नीतीचा रंग इथे दाखवत आहे, पण त्यांना शिकायचे असेल तर त्यांना भारतात रगेलांची नीती अगदी स्पष्ट दिसायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Naradaachi Kal---6
No Angels in Politics, only Rangels
Presently the veteran Congressman of 80 yrs, Mr.Rengel is making news in America. Ethics Committee formed with 4 members each of Democrats & Republicans is investigating charges against him of impropriety and has formally charged him of wrongdoings on 13 counts. This mainly involves solciting huge donations for a college being set up in his name in New York and misusing his office.
This is an embarassment for everybody as Mr.Rangel has been representing Harlem,New York since last 50 yrs in Congress and is due for re-elections in Nov.2010. If a strict punishment is handed to him, it will take away the support of blacks for democrats and if no action is taken against him then Republicans turn holier than thou !
This Rangel episode brings memories of Indian Politicians to our mind. At least credit would have to be given to Indian Roughe politicians that they generally do not leave any paper trails and of course unlike Mr.Rangel they would never face a public trial let alone any Congressional enquiry.
America perhaps can learn a lesson or two from Indian Politicians with their dictum that in politics there are no Angels but only Rangels !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
शुक्रवार, ३० जुलै, २०१०
गुरुवार, १ जुलै, २०१०
नारदाची कळ-५
पवारफुल क्रिकेट
आय सी सी आय चे माल्कम स्पीड ह्यांनी आरोप केलाय की पवारांना अध्यक्ष झाल्यावर पूर्ण वेळ मिळणार नाही. कारण ते भारताचे कृषी मंत्री आहेत व १२० कोटी लोकांच्या अन्नधान्न्याची व्यवस्था करण्यापासून त्यांना फुरसत मिळणार नाही. आता आपल्याला माहीत आहे की कृषीमंत्री काही पूर्णवेळ काम करणारे नसतात. आपल्याकडे पाऊसच दोन तीन वर्षांतून एकदा पडतो, शेतकरी इतके गरीब असतात की क्वचितच शेती करू शकतात, शिवाय ती परवडतही नाही. त्यामुळे हा आरोप जाऊ द्या. पण त्यांनी पुढे असे म्हटलेय की पवारांना क्रिकेट मधले कळत नाही. आता मात्र पवारांना क्रिकेट कळते हे दाखवूनच द्यावे लागेल.सोनी वाल्यांनी ( ह्यात सुप्रियांचे भांडवल आहे ) एक कार्यक्रमच ठेवला, "कळतच नकळत कळते ". ह्यातील काही सवाल-जवाब :
सोनी : एकाच वेळी दोन फलंदाज रन-आऊट होऊ शकतात का ?
पवार : कसे शक्य आहे ? आमची परंपराच आहे की एका वेळेस एकच जण "आऊट" होऊन बोलू शकतो. जसे: मी म्हणालो की शेती परवडत नाही, शेतकर्यांनी ती सोडून द्यावी की लगेच मॅडमकडून पॅकेजेस येतात. आमचे संपादक म्हणाले की साखरेचे भाव वाढले हे चांगलेच आहे कारण कमी साखर खाल्ल्याने मधुमेह होणार नाही, तर मग मी त्यांना कार्ल्याचा रस प्यायला लावतो.माझ्यावर काही आरोप झाले तर पटेलांना क्लीन चिट् मिळते.किंवा सुप्रियाला.
सोनी : एकदा "रिटायर्ड हर्ट" झालेला फलंदाज परत खेळू शकतो का?
पवार : का नाही ? मी स्वत: किती वेळा तरी परत खेळायला आलेलो आहे. आता आय पी एलचेच पहा. तिकडे भानगडी निघाल्या तरीही इकडे आयसी्सी चे जमलेच की ! आठच एमपी आले तरी दोघा तिघांना घबाड मिळालेच की. कधी मुख्य, कधी संरक्शण, कधी विरोधी, तर कधी कृषी मंत्री ! आता तर लोक म्हणायला लागलेत की क्रिकेटला दुसरे नाव ठेवा : प्वार-खेळ ! खरा अर्थ घ्या : पवार-खेळ ( विरोधक म्हणतील, पोर-खेळ , तर ते खरे नाही !)
सोनी : "फॉलो ऑन" म्हणजे काय ?
पवार : हा आमचा आदेश आहे. सगळ्या सग्या सोयर्यांना व जणतेला. आमच्या मागे या, कारण यातच आमचे भले आहे !
अरर बदलला का चॅनल !
-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)