नारदाची कळ-३
३-जी चे जी जी र जी जी !
नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान म्हणजे जी, प्रथम होते २-जी, आणि आता आले आहे ३-जी ! सरकारची अपेक्षा होती तीस हजार कोटीच्या आसपास. लिलावात मिळाले ६७ हजार कोटी !
एवढे पैसे मिळवून देणारे हे मोबाईलचे तंत्रज्ञान देईल इंटरनेट, टी.व्ही., कॉन्फरन्स व्हिडीओ कॉल्स, वगैरे. त्यासाठी हॅंडसेटस वेगळे (महागडे , १६/१७ हजाराचे ) लागतील. आता लोक विचारताहेत की एव्हढे महागडे तंत्रज्ञान आपल्याला परवडणार आहे का ? आणि हे विचारणारे आपले लोक आधीच मर्सीडीज, बीएमडब्ल्यू , ऑडी अशा प्रचंड महागड्या गाड्या घेऊन बसले आहेत.
हे आहे प्रचंड किंमतीच्या भूखंडांसारखे ! बिल्डरांना जसे कितीही महागडा प्लॉट परवडतोच ( कारण त्यावर फ्लॅटस् बांधून ते आपल्याकडनंच पैसे घेणार असतात ). कितीही किंमत कशी परवडते ? कारण कारपेट, बिल्ट अप, सुपर बिल्ट अप, असा घोळ कोणी मोजत बसत नाही . तसेच असते मोबाईलचे !
जी कंपनी मोबाईलचे बिलिंग करते त्यांना ते कोष्टकच लिहून देतात की १ मिनिट म्हणजे ४३ सेकंद ! आणि आता तर त्यांनी आपल्या गळी दर सेकंदा वर बिलिंग करण्याचे उतरवले आहे. आता आपण आपला सेकंद व त्यांचा सेकंद पडताळून पाहणार आहोत का ? व कसे ?
तुम्हाला हे कपोल कल्पित वाटत असेल तर इंटरनेट सेवा पुरवणार्या एम् टी एन एल च्या बिलिंग सेवेला भेट द्या. ते म्हणतात तुम्ही नुसते साइटवर गेलात तरी ते "डाऊन लोड" धरल्या जाते, अनलिमिटेड डाऊनलोड म्हणजे केंव्हांही डाऊनलोड, असे सर्रास लूटमारीचे कोष्टक ! असेच आहे टोल चे ! किती टोल वसूल झाला व किती खर्च झाला होता ह्याचा हिशोबच नसतो. आपण तर ते विचारीतही नाही. म्हणूनच तर नुसतेच भरभक्कम लिलाव नाही तर "राजा" ला भरपूर मलिदा देणेही परवडते. कारण ते परवडणे आपणच आपल्या खिशातून भरत असणार असतो !
-----अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com