marathi blog vishva

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

नारदाची कळ : २
क्लीन चीट !
आजकाल सगळेच राजकारणी खेळ-क्षेत्रात का आहेत ?
हे सगळे विश्व म्हणजे एक ब्रह्मचैतन्य आहे. आणि चैतन्याचा पाया आहे, क्रीडा. म्हणून ज्यांना चैतन्यमय राहायचे आहे त्यांना कुठलाना कुठला खेळ आवश्यक आहे. अगदी स्वत:च खेळले पाहिजे असे नाही. सहभाग आणि स्वाहम केले तरी चालते. शिवाय नाही तरी राजकारण खेळापासून फार वेगळे नाहीय. जसे: क्रिकेट हा खेळ तर राजकारण हा पोरखेळ !
साहेबांनी मोदींना ( दोन्ही मोदी ) क्लीन चिट का दिली ?
हे काय विचारणे झाले ! फारच बुवा तुमचे अज्ञान ! साहेब स्वत:च नाही का क्लीन चीट !
----कळलाव्या

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

नारदाची कळ
भारतीय वृत्तपत्रे भाषा नीट छापण्याच्या कामात फारच चुका करतात. आता हेच पहा ना ! बिचारे शशी थरूर . यूनो च्या सेक्रेटरी पदासाठी निवडणूक लढलेला हा थोर माणूस.( आता निवडून नाही आला हे यूनोचे कमनशीब.). त्याच्या तिसर्‍या मैत्रिणी संबंधी सगळे पत्रकार खार खाऊन आहेत. सानिया सारख्या एका सुंदर मुलीचे लग्न होते न होते तोच आता ही कोण सुनंदा पुष्कर आहे तीही लग्न करते आहे. सुंदर मुलींचे कितवे लग्न हा कधी प्रश्नच नसतो. वाईट असते ते त्यांना इतरांनी फितविणे. ह्याच जेलसी-न्यायाने ही घटनाच भारतीय पुरुषांना डिप्रेशन आणणारी. त्यात भारतीय पत्रकारांनी इतकी ढोबळ चूक करावी ! ही सुनंदा पुष्कर आता शशी थरूर ह्यांची मैत्रीण आहे व ते तिसरे लग्न करणार आहेत हे किती चूक आहे. पुष्कर मैत्रिण नसून खर्‍या बातमीत "पुष्कळ मैत्रिणी आहेत" अशी ओळ होती. त्याची मुद्रणात चूक करीत सुनंदा पुष्कर ही एकच मैत्रीण आहे हा समज पसरविणे हे थरूर साहेबांचे बदनामी करणारेच आहे. आता ते नक्कीच अब्रू-नुकसानीचा दावा ठोकणार पत्रकारांवर. रहा आता तयार किंवा माफीनामा छापा की खूप सुंदर मैत्रिणी आहेत थरूर साहेबांना !
-------कळलाव्या